Mahayuti Govt | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा यांना मिळून तब्बल 234 जागा मिळाल्या आहेत. यात एकट्या भाजपलाच 132 जागा मिळाल्या असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता निकालानंतर मुख्यमंत्रीपदी कोण बाजी मारणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Mahayuti Govt)
याबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका देखील सुरू आहेत. आज रात्रीपर्यंत यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच निकाल पाहता फडणवीस यांच्या बाजूने पारडं जड मानलं जात आहे.
फडणवीस आणि शिंदे यांची नावे आघाडीवर-
एकनाथ शिंदे यांनी अद्याप यावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेतही त्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे ते सहज मुख्यमंत्री पद सोडतील अशी चिन्हे सध्या तरी दिसून येत नाहीये. दुसरीकडे, भाजपकडून फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशात तर आरएसएसने देखील यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतंय.
निकाल लागल्यानंतर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा दर्शवली होती. त्यातच आरएसएसनेही फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाकडूनही याला पसंती मिळाल्याचं म्हटलं जातंय. भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत आहे. तसेच, आरएसएसनेही फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. (Mahayuti Govt)
आज मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्याची शक्यता-
संघामधील कोणत्याही बड्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं नसलं तरी काही मीडिया रिपोर्टमध्ये संघाने फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून ग्रीन साइन दिल्याचे म्हटले आहे. भाजपच्या विजयामध्ये संघाचीही मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे संघाचे मत महत्वाचे ठरले जाऊ शकते. त्यातच फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक देखील आहेत. मात्र, अजूनही मुख्यमंत्रीपदी कोण असणार, याची अधिकृत घोषणा झालेली नाही. (Mahayuti Govt)
मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस आणि शिंदे यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. अमित शहा यांच्याशी चर्चेनंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरणार आहे. आता या बैठकीत काय चर्चा होईल आणि कुणाला मुख्यमंत्रीपद मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
News Title – Mahayuti Govt Who will be CM of Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या-
निवडणूक होताच शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका!
निकालाबाबत मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा!
…तर त्यावेळी माझी चूक झाली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास’, अन् रोहित पवार अजितदादांच्या पायाच पडले; पाहा Video
‘मी कटाचा बळी ठरलो’; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप