मुंबई | महायुतीत (Mahayuti) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 5 डिसेंबरला घेतली. यानंतर महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तिन्ही पक्षातील आमदार मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी लॉबिंग सुरू केल्याचं दिसत आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद भूषवलेल्या दोन आमदारांचा पत्ता कट होणार असल्याचं समजतंय.
‘या’ दोन मंत्र्यांचा पत्ता होणार कट
शिंदे गटाने एका आपल्या आमदारांचे प्रगतीपुस्तक तपासल्याची माहिती समोर आली आहे. या प्रगतीपुस्तकानुसार शिंदेंचे दोन आमदार नापास झाल्याचं समजत आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता यावेळी कट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार प्रताप सरनाईक, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, महाडचे भरत गोगावले, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी इच्छुक असून मागील मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. मात्र यंदा संभाव्य यादीमध्ये गोगावले यांचेही नाव आहे. तर उदय सामंत, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक ही पाच नावं जवळपास निश्चित मानली जात आहे.
“एकनाथ शिंदेंचा निर्णय मान्य असेल”
शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं याचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आमदारांनी पहिल्याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्व शिवसैनिकांना, आमदारांना आणि नेत्यांना मान्य असेल असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये घेतले; माधुरीच्या गौप्यस्फोटाने सगळीकडे एकच चर्चा!
‘आम्हाला पण…’; रामदास आठवलेंच्या देवेंद्र फडणवीसांकडे मोठ्या मागण्या
‘या’ 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू, नक्की काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण; बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप
‘ही’ अभिनेत्री अंडरवर्ल्ड डाॅनसोबत बांधणार होती लग्नगाठ, स्वतः केला खुलासा