मोठी बातमी! शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?; संभाव्य यादी जाहीर

Shivsena | राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. यानंतर आता पुढील पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे.

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात दहा दिवस उलटूनही नवीन सरकार स्थापन झालेले नाही. आता 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. यापूर्वी उद्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार असल्याने उद्याच मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार आहे.

आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे कुठले नेते शपथ घेणार, याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे.

कोण-कोण शपथ घेणार?

शिवसेनेकडून (Shivsena) एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड, उदय सामंत हे शपथ घेणार असल्याचं समजतंय.

शपथविधीसाठी देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. भाजपशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“….तर एकनाथ शिंदे हे ठाकरेंना सोडून गेले नसते”, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

“मला 60 दिवसांच्या आत उचललं नाही, तर कंबोज बापाचं नाव बदलणार”

“शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट चांगला त्यामुळे…”; मंत्रीपदाबाबत भुजबळांचं मोठं वक्तव्य

लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे की नाही? अशाप्रकारे चेक करा

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांकडून सर्वात महत्त्वाची अपडेट!