सलमान खान ते सचिन तेंडुलकर..; महायुतीच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

Mahayuti Oath Ceremony | मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती आहे. (Mahayuti Oath Ceremony)

याचबरोबर बॉलीवूडसह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. तब्बल 40 हजार लोक बसतील, इतकी मोठी व्यवस्था ही शपथविधी सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. मोदी हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. यानंतर शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी

अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, रणविर सिंह, रणबीर कपूर या बॉलीवूड कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील मंचावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात हा सोहळा सुरू होणार आहे. (Mahayuti Oath Ceremony)

News Title : Mahayuti Oath Ceremony live 

महत्त्वाच्या बातम्या-

उदय सामंतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “एकनाथ शिंदेंचं पत्र घेऊन आम्ही…”

राज्याच्या इतिहासात ‘हे’ कधीच घडलं नाही, फडणवीस एकमेव जे…

अजितदादांच्या राष्ट्रवादीने किती मंत्रीपदं मागितली? बड्या नेत्यानी संख्याच सांगितली

“एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करत असेल, तर…”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

हवामान विभागाने सावध राहण्याचं केलं आवाहन! यामागचं कारण काय?