Mahayuti Oath Ceremony | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली. महायुती बहुमताच्या लाटेवर स्वार झाली. आज महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) मुंबईतील आझाद मैदानावर पार पडत आहे.
महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज शपथ घेतील. शपथविधीआधी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्रीपदाची (Mahayuti Oath Ceremony) शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस बुधवारी दोनवेळा वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यांनी शिंदेंसोबत चर्चा केली. यावेळी फडणवीसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय.
शिवसेनेला भाजपची नवी ऑफर
गृहखात्याच्या बदल्यात शिवसेनेला भाजपने नवी ऑफर दिल्याचं कळतंय. भाजप शिदेंना गृहखात्याच्या बदल्यात दुसरं महत्त्वाचं देणार असल्याचं कळतंय. शिवसेनेला गृहमंत्रिपदाच्या मोबदल्यात भाजपकडून महसूल खातं देण्यात येईल, असंही संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती आहे.
तुमच्या मागण्यांवर चर्चा केली जात आहे. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे तुम्हीही सरकारमध्ये सामील व्हावं, अशी इच्छा आहे. जर, फक्त मी आणि अजित पवारांनी शपथ घेतली, तर ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे तुम्हीही शपथ ग्रहण करावी, अशी विनंती फडणवीसांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा…’, तरुण महापौर ते मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास
एकनाथ शिंदेंचं ठरलं! मोठा निर्णय घेतला
“शिंदेंमध्ये दिल्लीसोबत पंगा घ्यायची हिंमत नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांनी डिवचलं
अखेर फडणवीसांच्या मनधरणीला यश, एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!
शपथविधीपूर्वीच सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव