Mahayuti | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीला बुलढाण्यात मोठा धक्का बसला आहे. बुलढाण्यात महायुतीच्या उमेदवाराला भाजपकडूनच विरोध करण्यात आला आहे. येथे शिंदे गटाकडून संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) निवडणुकीसाठी उभे आहेत. मात्र, त्यांना भाजपकडूनच आव्हान देण्यात आलंय. भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून संजय गायकवाड यांना आव्हान दिलंय. (Mahayuti)
यावेळी त्यांनी बंडखोरीमागील कारणही सांगितलंय. “मी बंडखोरी केली नाही. मी पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मागितलीये.मला विश्वास आहे की, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मला लवकरच परवानगी देतील. शिवसेनेच्या उमेदवाराने मागील 5 वर्षात भाजपाच्या गाव पातळीपासून देशपातळीवरील नेत्यांना अपमानित केलंय. पंतप्रधान मोदी यांना शिवसेनेच्या या उमेदवाराने शिवी देत अवमानित केलंय.”, असं भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे म्हणाले आहेत.
संजय गायकवाड यांना भाजपकडून आव्हान
“आमचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचा अवमान केला. माझ्यासह अनेकांवर जीवघेणे हल्ले या शिंदे गटाच्या उमेदवाराने केले. फडणवीस यांना ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले तर मी त्यांच्या तोंडात कोंबेन’ असं म्हणत त्यांचा अवमान केला. या सगळ्या कारणांमुळे मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो असून या मतदार संघातील भाजपची ताकद दाखविणार आहे.”, असं विजयराज शिंदे यांनी म्हटलं आहे. (Mahayuti)
दरम्यान, शिंदे गटाचे उमेदवार असलेले आमदार संजय गायकवाड यांना आव्हान देणारे भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचं निमंत्रण आल्याची माहिती समोर येत आहे. आता मुख्यमंत्री शिंदे आणि विजयराज शिंदे यांच्यात काय चर्चा होते आणि ते पुढे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष राहील. (Mahayuti)
News Title – Mahayuti Sanjay Gaikwad challenged by BJP
महत्त्वाच्या बातम्या-
“प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत”
‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी; डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार
पवार कुटुंबात फूट; 50 वर्षांत ‘हे’ पहिल्यांदाच घडलं
जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढणार- संभाजीराव पाटील निलंगेकर
‘धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार’; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास