Mahayuti | आज सोमवार, 4 नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. अशात महायुतीचं टेंशन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारासमोर एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे दोन्ही उमेदवार हे सध्या नॉट रीचेबल असल्याचं कळतंय. (Mahayuti)
राज्यात 20 नोव्हेंबररोजी निवडणूक होणार आहे. तर, 23 नोव्हेंबररोजी मतमोजणी पार पडणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यात शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल असल्याने महायुतीची चिंता वाढली आहे. नाशिकमधील देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाने दोन उमेदवार दिले आहेत.
अजितदादांच्या उमेदवारांना शिवसेनेकडून आव्हान
येथे शिवसेना शिंदे गटाने अनुक्रमे राजश्री अहिरराव आणि धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे. दिंडोरीतून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात माजी आमदार धनराज महाले तर देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांच्या विरोधात माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी अर्ज भरलाय. (Mahayuti)
अजित पवारांच्या या दोन उमेदवारांविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून महाले आणि अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही उमेदवार नॉट रीचेबल आहेत. त्यातच आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महायुतीचं टेंशन वाढलं
दुसरीकडे, उदगीर येथे विश्वजीत गायकवाड हे भाजपाकडून इच्छुक होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय बनसोडे यांना विश्वजीत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत तगडे आव्हान दिले होते. पण, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर विश्वजीत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे. (Mahayuti)
News Title – Mahayuti Shinde group 2 candidates not reachable
महत्त्वाच्या बातम्या-
“जिथं त्रास दिला, त्याला पाडायचंच..”, जरांगेंचे मतदारसंघ ठरले; वाचा संपूर्ण यादी
आज सोमवार, महादेव ‘या’ ३ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
‘…नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करु’, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीमुळे खळबळ
बारामतीत अजित पवारांना धक्का बसणार?; ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत