Mahayuti | विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अजित पवार गटाची चिंता वाढली आहे. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. येथे महायुतीत राष्ट्रवादीने बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपच्या सुरेश धस यांनीही याच जागेसाठी अर्ज भरलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडेसुद्धा सुरेश धस यांचा प्रचार करत आहेत. (Mahayuti)
अशात सुरेश धस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंकजाताई आणि पक्षाला विचारून मी बीड जिल्ह्यामध्ये घड्याळाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाची चिंता आता वाढली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात वादाची ठिणगी
भाजपचे भीमराव धोंडे यांनी देखील बंडखोरी करत येथे अर्ज भरलाय. तेसुद्धा आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यावरूनही सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केलाय. आष्टीच्या अपक्षच्या मागे कोण याच्या क्लीप माझ्याकडे आहेत. तसंच बीडच्या आष्टी मतदार संघात महायुतीचा उमेदवार असताना घड्याळाचा उमेदवार देणे हे मोठं षडयंत्र असल्याचं धस यांनी म्हटलं आहे. (Mahayuti)
बीडच्या आष्टी मतदार संघात महायुतीचा उमेदवार घोषित केला असतानाही षडयंत्र करून शेवटच्या दिवशी हे फॉर्म दिले गेले. हे खूप मोठे षडयंत्र माझ्या विरोधात सुरू आहे. मला रोखण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.
सुरेश धस यांचा इशारा
माझ्याविरोधात घड्याळाचा उमेदवार आहे. बीड जिल्ह्यात जिथे जिथे घड्याळ उभे आहे तिथे तिथे घड्याळाच्या विरोधात प्रचार करण्याची परवानगी मी मागितली आहे. तसेच घड्याळाच्या नेत्यावर मी बोलायला सुरुवात करणार असल्याचं देखील भाजप उमेदवार सुरेश धस म्हणाले आहेत. यामुळे बीडमध्ये महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आल्याचं दिसून येतंय. (Mahayuti)
News Title – Mahayuti Suresh Dhas will campaign against NCP
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती
“आम्ही गांXची अवलाद नाही, कार्यकर्त्याला हात लावला तर..”; ‘या’ नेत्याचा गुलाबराव पाटलांना इशारा
आज कार्तिकी एकादशी, विष्णु देव ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण करणार!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा वयाच्या 12 व्या वर्षापासून ड्रग्सच्या विळख्यात!
महायुती सरकारने गोरगरिबांचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं- संभाजी पाटील निलंगेकर