बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काहीही म्हटलं तरी तुमची ओळख लाचखोर नवऱ्याची बायकोच”

मुंबई | पारनेरमध्ये बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा महेबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमची ओळख लाचखोर नवऱ्याची बायको हीच आहे. लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं नाव वाघ असल्यामुळे मांजर ‘वाघ’ होत नाही. आपल्या नवऱ्याने कशात आणि कोणत्या प्रसंगात लाच घेतली यावर अधिक स्पष्टपणे तुम्ही बोला, असं महेबूब शेख यांनी म्हटलं आहे.

आम्ही पवारांचे कार्यकर्ते आहोत म्हणून काही बंधने पाळतो नाहीतर असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी त्याच्या पुढची भाषा महेबूब शेख बोलू शकतो आणि महेबूब शेख कशालाच घाबरत नाही, असंही महेबूब शेख यांनी टीका करताना म्हटलं आहे.

दरम्यान, पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी लंकेंवर टीका केली होती. यावरून महेबूब शेख यांनी पारनेरमधील सभेत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांच्यातील शाब्दिक युद्ध काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये.

थोडक्यात बातम्या- 

“…मग आरएसएसचा ‘सरसंघचालक’ मुस्लिम बनवून दाखवा”

काय सांगता! कंगणा राणावतने केला आडनावात बदल; ठेवलं ‘हे’ नवं नाव

“तीन पक्षाचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट झालंय, तुटेगा पर छुटेगा नही”

‘सैयां भये कोतवाल, अब डर काहे का?’; शरद पवारांच्या टीकेवर भाजपचं प्रत्युत्तर

“मंत्र्यांवर आरोप करण्यापुर्वी आयपीएस, आयएएस अधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटतात”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More