बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मांजर कधी ‘वाघ’ होत नाही, अन् असल्या मांजरीला मी घाबरत नाही”

मुंबई | राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद आता विकोपाला गेला आहे. महेबूब शेख यांनी पारनेरच्या सभेत चित्रा वाघ यांना लाचखोर नवऱ्याची बायको असा उल्लेख केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनीही महेबूब शेख यांना प्रत्युत्तर दिलं होतं. अशातच पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर महेबुब शेख यांनी टीका केली आहे.

असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही. मांजर कधी वाघ होत नाही आणि असल्या मांजरींना मी घाबरत नाही, अशी टीका महेबूब शेख यांनी केली आहे.

चित्रा वाघ स्वत:ला वाघ म्हणतात पण मांजर वाघ होत नसते, असल्या खोट्या वाघांसोबत माझा मुलगा रोज खेळत असतो. वाघ काय आहे मला नीट माहित नाही पण त्यांची बरीच प्रकरण बाहेर काढणार असल्याचं म्हणत महेबूूब शेख यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे.

दरम्यान, आम्ही म्हणतो आमची नार्को करा तसं तुमच्या नवऱ्याची नार्को टेस्ट करा, असं आवाहन महेबूब शेख यांनी केलं आहे. त्यानंतर मी माझ्या नवऱ्यची नार्को टेस्ट करायला तयार असून मलाही तुमच्यातील दम बघायचा आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. आता पुन्हा महेबूब शेख यांनी केलेल्या टीकेवर चित्रा वाघ काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“सहकार क्षेत्र संपवण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र”; शरद पवारांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, ‘त्या’ प्रकरणावर पहिल्यांदाच मांडलं प्रखर मत?

“सिद्धार्थच्या गाडीच्या काचा फुटलेल्या होत्या, त्याच्या मृत्युमागचं खरं कारण कळू द्या”

अंधश्रद्धेचा कळस! पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करुन त्यांच्यासोबत केलं धक्कादायक कृत्य

‘मोहन भागवतांनी माझ्या ज्ञानात भर घातली’; भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पवारांचा टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More