उस्मानाबाद | शिवसेना आणि भाजपच्या युतीचा वाद सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईल, हा वाद मिटवण्याचा मी प्रयत्न करेन, असं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांनी म्हटलं आहे. हंडोग्री गावात ते बोलत होते.
आमचा पक्ष लहान आहे. भाजप-शिवसेना एकत्र आले तर फायदाच होईल, असा विश्वासही जानकरांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागात रेल्वेने पाणी पोहचवल्यानंतर जनावरांसाठी चाराही आणू, अशी ग्वाही यावेळी जानकरांनी दिली.
दरम्यान, देशाच्या राजकारणासाठी आम्हाला युती हवी आहे, पण भाजप लाचार नाही, असं नुकतंच जालन्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–आता तुम्हालाही येऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन…
–देश चोरांच्या हाती जाऊ नये म्हणून युती हवी; नाहीतर कुणासमोर लाचार नाही!
-आता आलिया भटसोबतचं रणबीर कपूरचं नातंही संकटात???
–लातुरात घडला शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार
–मारुती-सुझुकीची नवी बलेनो ग्राहकांच्या भेटीला; पाहा काय आहे किंमत…