खेळ

…म्हणून मी 19 व्या षटकात धावा घेतल्या नाहीत; पराभवानंतर धोनीचे स्पष्टीकरण

बंगळुरु | काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अवघ्या 1 धावांनी पराभव केला. यावेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 19 व्या षटकात एकेरी-दुहेरी धावा काढल्या असत्या तर सामना जिंकता आला असता अशी चर्चा होत आहे.

धोनीने यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मैदानामध्ये दवं पडले होते. त्यामुळे चेंडू बॅटवर येत नव्हता. नविन खेळाडूला बॅटींग करणे अवघड गेले असते त्यामुळे मीच फटके मारण्याचा निर्णय घेतला, असं तो म्हणाला आहे.

सामना जिंकण्यासाठी 1 धाव कमी पडल्याने तसे वाटणे साहजिक आहे. पण मी धावा काढल्या असत्या तर नव्या खेळाडूकडून चेंडू डाॅट जाण्याची शक्यता होती, असंही तो म्हणाला आहे.

दरम्यान, शेवटच्या षटकात 26 धावांची आवश्यता होती. यावेळी धोनीनी 5 चेंडूत तब्बल 24 धावा काढल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर शार्दूल ठाकूर धावबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या

-पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी दूरदृष्टी दाखवावी- उद्धव ठाकरे

-साध्वी प्रज्ञा सिंह यांना आता मतदारांनीच धडा शिकवावा- अण्णा हजारे

-“मला शेतकऱ्यांचा नेता नाही, तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात”

-ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का?- हितेंद्र ठाकूर

तरुणाईला ‘चौकीदार’ नाही तर मालक व्हायचंय- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या