बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण!

रांची | टीम इंडियाचा माजी कप्तान आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये व्यस्त असताना त्याचे आई-वडील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. धोनीच्या पालकांना रांचीमधील बरियातू रोडवर असलेल्या पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती समोर आली आहे. धोनीच्या आई-वडिलांची ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात असल्यानं काळजीचं कोणतंही कारण नाही. पल्स रुग्णालय प्रशासनाच्या माहितीप्रमाणं सुदैवानं कोरोना दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला नाही. दोघांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन ते निगेटिव्ह येतील आणि त्यांना सुट्टी मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

झारखंडमध्ये मंगळवारी 4 हजार 969 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर, राज्यात कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 72 हजार 315 वर गेली आहे. आरोग्य विभागानं काल रात्री जाहीर केलेल्या कोव्हिड बुलेटिननुसार राज्यात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 37 हजार 590 इतकी आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण बरं होण्याचं प्रमाण राष्ट्रीय सरासरी 85.60 टक्क्यांच्या तुलनेत 79.84 टक्क्यांपर्यंत खाली गेलं आहे. तर झारखंडमधील मृत्यूचं प्रमाण 0.89 टक्के इतकं आहे.

दरम्यान, झारखंडमधील वेगवेगळ्या रुग्णालयात कालच्या दिवसात 45 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 1547 इतकी झाली आहे. तर राज्यातील विविध कोव्हिड रुग्णालये आणि होम आयसोलेशनमध्ये सध्या 33 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धोनीचे कुटुंबीय राहत असलेल्या रांची शहरातच सर्वाधिक 1703 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत.

थोडक्यात बातम्या

“अजित पवारांनी झोप कमी करून पुण्याकडं लक्ष द्यावं, अन् झेपत नसेल तर…”

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

धक्कादायक! नाशिकमध्ये चक्कर येऊन एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू

तिसरं मुल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा- कंगणा रणावत

‘मी देशासाठी मरतोय, पण…’; पत्नीला बेड न मिळाल्याने BSF जवानाचा आक्रोश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More