भाजपला मोठा धक्का; अवघ्या 3 महिन्यात या नेत्याचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदाबाद | 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंग वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंग वाघेला यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

याचवर्षी जुलै महिन्यात महेंद्र यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र फक्त 3 महिन्यातच त्यांनी भाजपमधून निघत स्वपक्षात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात शंकर सिंग क्षत्रिय समाजाचे वजनदार नेते आहेत. त्यांनी भाजपविरोधी मोहीम हाती घेतली अाहे. तर आपण आता आपल्या वडिलांना मदत करणार असल्याचं महेंद्र यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महेंद्र हे भाजप प्रवेश करण्यापुर्वी काँग्रेसचे आमदार होते. मुलाने जर निर्णय बदलला नाही तर त्याच्याबरोबर कायमचे नाते तोडणार, अशी धमकी शंकरसिंग यांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-अभिनेता सलमान खान साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

-जानकरसाहेब, आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही- प्रीतम मुंडे

-मोदींना भेटण्याचा हट्ट धरणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

-बताओ कौनसा प्राणी?; खासदार संजय राऊतांना एका साधूचं कोडं

-पाकिस्तानच्या खेळाडूंची अक्कल जेव्हा पेंड खायला जाते, तेव्हा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या