बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यांना मी परवडणार नाही”, बॉलिवूडबद्दल महेश बाबू बेधडक बोलला

मुंबई | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूचे (Mahesh Babu) जगभरात लाखो चाहते आहेत. आपल्या डॅशिंग पर्सनालिटीने व अभिनय कौशल्याने महेश बाबूने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या महेश बाबूने सर्वांनाच भूरळ पाडली आहे.

महेश बाबूचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतात. सतत काहीना काही कारणांमुळे चर्चेत असलेला महेश बाबू लवकरच बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांवर आता स्वत: महेश बाबूनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीला मी परवडणार नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट करून मला माझा वेळ फुकट घालवायचा नाही, असं बेधडक मत महेश बाबूने बॉलिवूडबद्दल मांडलं आहे. मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळाल्या नाहीत. पण मला नाही वाटत की मी त्यांना परवडेन, असं वक्तव्य महेश बाबूने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत केलं आहे.

दरम्यान, जो स्टारडम आणि आदर मला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत (South Film Industry) मिळतो तो फार मोठा आहे. त्यामुळे मी माझी सिनेसृष्टी सोडण्याबद्दल कधीच विचार करू शकत नाही, असं देखील महेश बाबू या मुलाखतीत बोलताना म्हणाला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राज ठाकरे चुहा है’, भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

टेंशन वाढलं! राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत

कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी चुकुनही करू नका ‘ही’ चूक

उष्णतेच्या लाटेसह राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘जेव्हा आदित्य ठाकरेंना तुरूंगात टाकण्यात येईल तेव्हा…’; नवनीत राणांना संताप अनावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More