बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भोसरी भागातील लोकांसाठी आनंदाची बातमी, विजेचा लपंडाव संपणार!

पिंपरी | पिंपरी महापालिकेत समाविष्ट झालेल्या भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावातील विजेचा लपंडाव संपणार आहे. च-होली, वडमुखवाडी, मोशीसह भोसरी मतदारसंघात आवश्यकतेनुसार महावितरणने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होणार नाही. धोकादायक ट्रान्सफॉर्मर महावितरणने हटवले आहेत. अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा कामाचा टाटा मोटर्स एम्प्लोईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे यांच्या हस्ते आज (बुधवार) शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहर सुधारणा समितीचे सभापती राजेंद्र लांडगे, नगरसेविका नम्रता लोंढे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे, राजश्री शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोईनवाड, युवा नेते स्वप्निल लांडगे, शिवराज लांडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण विभागामार्फत भोसरी मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी विशेष प्रयत्न करत जिल्हा नियोजन समिती व प्रणाली बळकटीकरण योजने मधून निधी मंजूर करुन घेतला.

भगतवस्ती येथे 630 केवी एचे नवीन ट्रान्सफॉर्मर ज्यादा क्षमतेचा, सेक्टर 10 एमआयडीसी भोसरी येथे सद्यस्थितीतील ट्रान्सफॉर्मर वर ज्यादा क्षमतेचा 315 केवी ए, साई मंदिर वडमुखवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. च-होली बैल घाट येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झालेला आहे. तसेच कोतवाल वाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर 630 केवी मंजूर झाला असून काम चालू करण्यात येणार आहे. च-होली स्मशानभूमी येथे नागरिकांच्या मागणीनुसार नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More