Loading...

पूरग्रस्तांची मदत करुन लांडगे परिवाराने जपला 50 वर्षांचा ऋणानुबंध

पिंपरी | भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची सध्या परिसरात एकच चर्चा आहे. यानिमित्ताने लांडगे परिवाराचे कोल्हापूरशी असलेल्या ५० वर्षांचे ऋणानुबंध समोर आले आहेत.

६५ वर्षीय पैलवान किसनराव लांडगे यांनी कोल्हापुरातील आरे गावचे संभाजी वरुटे, जयसिंग पाटील आणि कै.बाजीराव वरूटे यांच्यासोबत कुस्तीचे धडे गिरवले. आठवडाभरापूर्वी कोल्हापुरातील याच गावांना महापुराने विळखा घातल्याने ते अस्वस्थ झाले होते.

Loading...

आमदार महेश लांडगे यांनीही कोल्हापुरात ३ वर्ष कुस्तीचा सराव केला होता. त्यामुळे पिता-पुत्रांना कोल्हापूरकरांना मदत करण्याची ओढ लागली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग सुरु होताच लांडगे कुटुंबाने २० ट्रक मदतीचे साहित्य कोल्हापूरला पाठवले.

आमदार लांडगे यांनी स्वत: आरे गाव गाठून मदतीचा हात पुढे केला. याचबरोबर कागल-बानगे, गडहिंग्लज-भडगाव, भुदरगड-शेणगाव, गगनबावडा-पाटपन्हाळा इत्यादी ठिकाणीही मदत केली.

Loading...

पूरग्रस्तांची आरोग्य तपसणी-

भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघाचे अध्यक्ष योगेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आमदार महेश लांडगे यांनी 12 तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पूरग्रस्तांसाठी पाठवले आहे. “२ रुग्णवाहिका आणि ३ हजार कुटुबियांसाठी लागणारी ६ लाख रुपये किमतीची औषधे पाठवली आहेत. 150 कुशल मनुष्यबळ देखील मदतीला पाठवले आहे. रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे हे पथक दिवसरात्र मेहनत घेत आहे”, असं योगेश लांडगे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-“विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा हात पिरगळलाच नाही”

Loading...

-ते शिवसेनेतून आले, राष्ट्रवादीकडून हरले आणि पुन्हा शिवसेनेत निघून गेले!

-ही गुन्हे शाखा आहे की सेटलमेंट ब्रॅन्च आहे?; आर्थिक गुन्हे शाखेच्या कामगिरीवर संजय बर्वे संतापले

-मुंबईच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदी ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती?

-आदित्य ठाकरेंना भाजपच्या नगरसेवकांनी रोखलं; युतीतील मतभेद चव्हाट्यावर

Loading...