पुणे | भाजपचे भोसरी मतदारसंघातले उमेदवार आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थनार्थ भोसरीत पोस्टर लागले आहेत. ‘परमनंट आमदार महेश लांडगे’ असं लिहीत आमदार महेश लांडगेंचं अभिनंदन करण्यात आलं आहे. त्यामुळे भोसरीत चर्चांना उधाण आलं आहे.
महेश लांडगे याआधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर आता त्यांना भाजपकडूनउमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या समर्थकांना वियजाची खात्री असल्याने हे पोस्टर लावल्याची चर्चा आता परिसरात होत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडलं. उद्या निकाल समोर येईल मात्र त्याआधीच काही उमेदवारांच्या समर्थनार्थ पोस्टर लागल्याचं पहायला मिळतंय. भोसरीतही याचाच अनुभव आला.
दरम्यान, उद्या निवडणुकीचा निकाल समोर येईल. आणि राज्यात कुणाची सत्ता येणार यासह प्रत्येक मतदारसंघाचंही चित्रही स्पष्ट होईल. भोसरीत निकालाआधी पोस्टर लागल्याने इथल्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
‘हिरकणी’ला थिएटर मिळालं नाही तर…- पाहा व्हीडिओ-
महत्वाच्या बातम्या-
दिवाळीच्या तोंडावर सॅमसंगचा हा स्मार्टफोन 8 हजार रूपयांनी स्वस्त! https://t.co/IiDqbpopA4 #Samsung
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
रिंकू राजगुरू म्हणते, Yes… I’m Single https://t.co/o6htUPpRC7 @rinku_rajguru #single
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
“रावसाहेब दानवेंना तात्काळ अटक करा” https://t.co/sJ9RzYc8mm @nawabmalikncp @raosahebdanve
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
Comments are closed.