पुणे महाराष्ट्र

“हजारो कामगारांच्या रोजीरोटीचं साधन असलेल्या उद्योगांना संकटातून बाहेर काढा”

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव MIDC क्षेत्रात आॅटोमोबाईल क्षेत्रात मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक उद्योजकांनी आपल्या कंपन्यांना टाळं लावण्यास सुरुवात केली आहे. उद्योजकांना मंदीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पिंपरी चिंचवड, चाकण, रांजणगाव एमआयडीसीतील आॅटोमोबाईल इंडस्ट्री संपूर्ण जगाच्या नकाशावर पोहोचल्या आहेत. पण सध्या आॅटोमोबाईल इंडस्ट्रीत मंदीची स्थिती निर्माण झाली असून उद्योगधंद्याना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. अनेक वाहन उद्योग बंद पडत असून अनेक कामगार हे पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव या औद्योगिक नगरीतील याच उद्योगांवर अवलंबून आहेत, असं महेश लांडगे यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.

संबंधित MIDCतील कंपन्या स्थलांतरित होत आहेत. जर त्या येथून स्थलांतरित झाल्या तर त्याचा खूप मोठा दूरगामी परिणाम पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सर्व संबंधित ठिकाणी होणार आहे, अशी काळजी त्यांनी व्यक्त केलीय.

दरम्यान, याबाबत गांभीर्याने विचार करुन या इंडस्ट्रीला मंदीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मोठी आर्थिक तरतूद करुन संबंधित उद्योगांना करमुक्त करणं गरजेचं आहे. त्याद्वारे हे उद्योग याच ठिकाणी स्थीरस्थावर ठेवून मदत करावी, अशीही मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!

-पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे

-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या