बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेश लांडगेंना लाखाच्या फरकाने निवडून आणणार; मोशी-डुडूळगावकर वासियांचा निर्धार

पिंपरी | पिंपरी- भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाच वर्षात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. विविध कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे त्यांना लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचा निर्धार मोशी-जाधववाडी-डुडूळगावकरांनी केला आहे.

महेश लांडगे यांच्यामुळेच समाविष्ट गावातील साध्या घरातील दोघेजण शहराचे महापौर झाले. ते सर्वसामान्यांसाठी आधार आहेत. त्यामुळे त्यांना लाखाच्या फरकाने निवडून आणू असा शब्द मोशी-जाधववाडी-डुडूळगावकरांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मोशी, डुडूळगाव आणि जाधववाडी परिसरातील कार्यकर्त्यांचा मोशीतील जय गणेश मंगल कार्यालयात भव्य संकल्प मेळावा बुधवारी पार पडला. त्यावेळी महेश लांडगेंसह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आमच्यासोबत असणा-या नागरिकाच्या परिवाराचा विश्वास आमच्यावर आहे. आजपर्यंत एक टक्काही कोणाचा नुकसान झाले नाही. कोणाचे कधीच वाईट करत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत साथ देणा-यांसोबत मी कायम आहे. दुस-यासाठी त्याग करणारी आमची टीम आहे, असं महेश लांडगे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More