महाराष्ट्र मुंबई

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणाले…

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं काल रिलीज झालं. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

‘ये नयन डरे डरे’ असं अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचं नाव आहे. या गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  पुण्याचे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी देखील अमृता फडणवीसांच्या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. त्यावर महेश लांडगे यांनी कमेंट केली आहे. ‘व्हॉट अ साँग…. नाईस व्हाइस, असं महेश लांडगे म्हणालेत.

हे गाणं सारेगामा ग्लोबलची निर्मिती आहे. हे रोमॅन्टीक गाणं असलं तरी मी या गाण्यामध्ये स्वत:चीच व्हॅलेंटाइन असल्याप्रमाणे एन्जॉय केलं. हा अनुभव खूप छान होता, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी हे गाणं शेअर केलं आहे.

अमृता फडणवीसांच नवीन गाणं समुद्र किनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं आहे. ये नयन डरे डरे, असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणावर अनिल देशमुखांनी सोडलं मौन, म्हणाले…

व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकला सुप्रिम कोर्टाचा धक्का

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे ‘या’ आमदाराला येत आहेत धमक्यांचे फोन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या