पुणे महाराष्ट्र

पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश लांडगेंचा स्तुत्य उपक्रम

Loading...

पिंपरी | कोल्हापूर-सांगलीच्या पुरानं होत्याचं नव्हतं झालं असून पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करणं गरजेचं आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी यासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना ते जर्सी गायींचं वाटप करणार असून त्यासाठी लागणाऱ्या गायी थेट गुजरातवरुन आणल्या जाणार आहेत.

जीवनावश्यक वस्तूंसह जनावरांसाठी कडबाकुट्टी आदी साहित्याचे 28 ट्रक घेऊन लांडगे पूरग्रस्त भागात गेले होते. मदतीचं वाटप करुन भोसरीत परत आल्यानंतर त्यांनी पशुधनाच्या मदतीसाठी बैठक घेतली. या बैठकीत पशुधन म्हणून जर्सी गाय देण्याचं ठरलं.

दररोज 10 ते 12 लीटर दूध देणाऱ्या गाईंमुळे पूरग्रस्त कुटुंबं लवकरात लवकर सावरून त्यांची आर्थिक घडी बसण्यात मदत होईल. त्यासाठी पशुधन देण्याची तयारी दाखवलेल्यांकडून पैसे घेऊन गुजरातवरुन दुभत्या गाई आणल्या जाणार आहेत.

दरम्यान, पूरग्रस्तांना गाई-म्हशी देण्याचं आवाहन महेश लांडगे यांनी केलं होतं. दोनच दिवसात त्यांच्या या आवाहनाला 40 जणांनी प्रतिसाद दिला आहे. पशुधन देण्याची इच्छा असणारांनी 7720043860 / 9765649797 या नंबरवर संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-तिकीट नाकारलेल्या किरीट सोमय्यांकडे भाजपने सोपावली ही जबाबदारी!

-छोट्या दानवेंकडे भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी!

-मनसे नेते अनिल शिदोरेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणतात..

-“देवांचा राजा इंद्र; महाराष्ट्राचा राजा देवेंद्र”

-‘आघाडी-बिघाडी’ बंद करा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या