बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार महेश लांडगेंचा भोसरीत विकास कामांचा एकच धडाका

पिंपरी | भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेहरुनगर, अजमेरा कॉलनी, मासळूकर कॉलनीत विकासकामांचा धडाका सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांच्या विकास निधीतून ही विकासकामं केली जात आहेत.

अजमेरा कॉलोनीमधील अंतरिक्षा गृहनिर्माण सोसायटीत लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात येत आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून खेळणी बसविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, आशा काळे यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजमेरा, उद्यमनगर, यशवंतनगर, पिंपरी येथील भागातील रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. कामगारांची वर्दळ नेहमीच असते. आजूबाजूला सोसायट्या आहेत. शाळेतील मुले रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे अपघात टाळण्याकरिता आणि वाहनांचा वेग कमी करण्याकरिता अजमेरा, उद्यमनगर भागातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात येणार आहेत. तसेच या परिसरात औषध फवारणी देखील केली जाणार आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More