बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भोसरी विधानसभा मतदारसंघातून हा उमेदवार आघाडीवर

पुणे | सुरूवातीच्या कलानुसार भोसरीतून भाजपचे उमेदवार महेश लांडगे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे पिधाडीवर आहेत.

मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्यात युतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पुण्यात महेश लांडगे आघाडीवर आहेत. याआधी ते अपक्ष आमदार होते. तर आता ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. पहिल्या कलाच्या अपडेट्सनुसार त्यांना आघाडी मिळाल्याचं दिसत आहे.

कालच त्यांच्या विजयाचे पोस्टर भोसरीत लागले होते.  त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकाला आधीच फ्लेक्स लागल्याने परिसरात चर्चेला उधाण आलं होतं.

दरम्यान, आज राज्याच्या विधानसभेचा निकाल लागतोय. राज्याच्या सत्तेच्या चावी कुणाकडे जाणार हे लवकर स्पष्ट होईल. आणि भोसरीत कोण विजयी होईल हेसुद्धा पहावं लागेल.

उदयनराजेंसाठी साताऱ्याची लढत कठिण- संजय राऊत –

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More