Top News पुणे महाराष्ट्र

‘सर तुम्ही पेलाय’! गाडीला धडक दिली म्हणून मांजरेकरांनी मारली चापट

दौंड | प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला काल पाठीमागून धक्का दिला. मांजरेकर यांच्या गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांचा  संबंधित व्यक्तिसोबत वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. मांजरेकरांच्या गाडीला मारूती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीने धडक दिली. याबाबत तक्रारदार व्यक्तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कैलास सातपुते असं तक्रारदाराचं नाव आहे.

महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने आपली कार त्यांच्या कारला पाठी मागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी ‘तू दारू पिउन गाडी चालवतोस का’ असं म्हणत आपल्याला चापट मारली, असं कैलास सातपुतेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणाऱ्या यवत पोलिसांकडे दिली आहे. मांजरेकरांवर यवत पोलीस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात एकपण शहर नको, ही शिवभक्ती म्हणा नाहीतर इतिहासाचा भान”

“मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध”

“केंद्रीय मंत्री किंवा सरकारमधील कोणत्या नेत्याने लस का टोचून घेतली नाही”

…म्हणून पुढचे 2 दिवस मुंबईसह राज्यात कोरोना लसीकरण बंद राहणार!

IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर दिसले आठवडी बाजारा

‘…त्यावेळी आम्ही कोरोनावरील लस घेऊ’; राजनाथ सिंह यांनी सांगितली वेळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या