महेश मांजरेकर मनसेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

महेश मांजरेकर मनसेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

कोल्हापूर | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे जवळचे मित्र चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कोल्हापुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची भेट घेतली. त्यामुळे आता मांजरेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होऊ लागली आहे.

कोल्हापुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरवात झाली आहे. जनसंघर्ष यात्रेसाठी सर्व प्रमुख नेते कोल्हापुरात आहेत. त्यात मांजरेकरांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली. त्यामुळे मांजरेकर मनसेत नाराज आहेत. ते काँग्रेसमध्ये जाणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मी शुटींगसाठी कोल्हापुरात असल्याने मित्र म्हणून अशोक चव्हाणांना भेटलो, असं मांजरेकरांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-टायर फुटला, आता नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही- विखे-पाटील

-राहुल गांधी घाणेरड्या नाल्यातील किडा, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली

-नवरा-बायको विमान चालवत आहेत, मला आशा आहे ते भांडणार नाहीत!

-हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे; ‘बॉईज 2’ चा टीझर प्रदर्शित

-…फक्त पाहणी नको, अाधी खड्डे बुजवा; कोकणवासियांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं!

Google+ Linkedin