बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त! प्रकृतीबाबत आली ‘ही’ मोठी माहिती समोर

मुंबई | प्रसिद्ध कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली होती. महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यानंतर आता त्यांची मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली आहे. आता मांजरेकर यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांनी बाॅडी चेकअप करून घेतलं. त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना ब्लॅडर कॅन्सर असल्याचं सांगितलं. त्यानंतर लगेचच मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डाॅक्टरांनी घेतला. आता त्यांची शस्त्रक्रिया पुर्ण झाली असून ते फिट असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईतील एच एन रिलायन्स फाउंडेशन रूग्णालयामध्ये त्यांची शस्त्रक्रिया पार पडली आहे. 10 दिवसांंपुर्वी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता मांजरेकरांना घरी सोडण्यात आलं आहे. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच त्यांना रूग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

दरम्यान, आता मांजरेकर पुर्णपणे फिट असल्याची माहिती देखील समोर येत आहे. कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक असं अष्टपैलू व्यक्तीमहत्व आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटात महेश मांजरेकर यांची ख्याती आहे. अनेक चित्रपटात त्यांनी कलाकार म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी ‘व्हाईट’ या चित्रपटाची घोषणा केली होती.

थोडक्यात बातम्या-

“14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?”

“पटोले आडाणी भाषेत टीका करतात, मग दानवेंनी केली तर मिरच्या झोंबल्या का?”

अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?

मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, ते…- नाना पाटेकर

योगी सरकारची मोठी घोषणा; राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला देणार ‘हे’ नाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More