बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेश मांजरेकर यांनी लेकीच्या अभिनयाविषयी सांगितली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

मुंबई । बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर गेल्या काही दिवसांपासून ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. महेश मांजरेकर हे आपल्या सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. नेहमीच ते कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेले पहायला मिळतात.

महेश मांजरेकर आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच्या संपर्कात असतात. एवढंच नाही तर महेश मांजरेकर हे त्यांच्या खासगी जिवनामुळेही सतत चर्चेचा विषय ठरत असतात. यावेळी ते आपल्या लेकीच्या भूमिकेवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

मांजरेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सईच्या दबंग 3 मधील अभिनय त्यांना आवडला नाही. हे मी तीलाही सांगितलं. तिच्या व्यक्तीमत्वाला शोभेल अशा भूमिकेमध्ये मला तिच्याशिवाय इतर कोणालाही पहायचे नाही. मी दुसऱ्याच्या भूमिकेची वाह वाह करणार नाही, कारण ती माझी मुलगी आहे असं महेश म्हणाले.

दरम्यान, सईने दबंग 3 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केलं होतं. काही दिवसांपूर्वी सईच्या अफेअरच्या चर्चांना उधाने आलं होतं. तर सई निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशा या चर्चा रंगल्या होत्या.

थोडक्यात बातम्या – 

बाॅलिवूडला मोठा धक्का! सदाबहार अभिनेते रमेश देव यांचं निधन

स्मार्टफोनमध्ये डॉक्युमेंटवर डिजिटल स्वाक्षरी कशी कराल?; वाचा संपूर्ण प्रकिया

Breaking| 10 वी 12 वीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

“आम्ही पीत नाही त्यामुळे वाईन आणि दारुतला फरक शरद पवारांनी समजून सांगावा”

निळू फुले यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर, मुलीनं केला खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More