बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बॉस मराठी 4’ महेश मांजरेकर नाहीतर ‘हा’ अभिनेता होस्ट करणार?

मुंबई | बिग बाॅस मराठी (Bigg Boss Marathi) हा शो अतिशय लोकप्रिय शो पैकी एक आहे. बिग बाॅसच्या घरात होणारी मैत्री, वाद, हे नेहमीच चर्चेत असते. बिग बाॅसचे तीनही सिझन सुपरहिट ठरले होते. आता या तीन सिझनच्या यशानंतर चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याची माहिती कलर्स मराठीने दिली आहे.

बिग बाॅसच्या तीनही सिझनचे सुत्रसंचलन महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांनी केले होते. पण आता चौथ्या भागाचे सूत्रसंचालन हे महेश मांजरेकर करणार नाहीत, अशा चर्चा आहेत. त्यामुळे आता चौथ्या सीझनचे होस्ट कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, परंतु कलर्स मराठी वाहिनीकडून यावर कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

महेश मांजरेकर यांनी आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मांजरेकर म्हणाले, माझ बिग बाॅस या कार्यक्रमाचे काॅन्ट्रॅक्ट 3 वर्षांचं होतं, ते आता संपलं आहे. मला त्यात पुन्हा घेतलं तर मला तो कार्यक्रम करायला आवडेल. जर मला या शोमध्ये पुन्हा घेतलं तर मी तेवढ्याचं मेहनतीने करेन, आणि नाही घेतलं तर तेवढ्याच उत्साहाने बघेन.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बिग बाॅसच्या चौथा सिझन अभिनेता सिद्धार्थ जाधव(Sidharth Jadhav) होस्ट करणार आहे, अशा चर्चा आहेत. सिद्धार्थ हा मराठी सिनेमा सृष्टीतील एक यशस्वी अभिनेता आहे. त्याने केवळ मराठीतूनच नव्हे, तर बाॅलिवूड चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. त्यामुळे सिद्धार्थ बिग बाॅसच्या चौथ्या सिझनचा होस्ट म्हणून आपल्याला लवकरच दिसू शकतो. परंतु सिद्धार्थ यावर अजून स्पष्ट बोलला नाही.

 

 

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा गौरव होतो”

संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत

आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!

दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

‘मामी म्हणलेलं मला आवडतं, फार मजा येते’ -अमृता फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More