बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माही’ झाला पुणेकर; पुण्यातील ‘या’ भागात घेतलं आलिशान घर 

पुणे |  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान खेळाडू महेंद्रसिंग धोनी यानी मुंबईनंतर आता पुण्यातही घर घेतलं आहे. सध्या आयपीएल 2021 स्थगित झाल्यामुळं धोनी त्याच्या कुटुंबाबरोबर रांचीत सुट्ट्या घालवत आहे. रांचीत त्याचा फार्म हाऊस आहे. त्याच ठिकाणी सध्या तो राहात आहे. त्यातच त्यानं आता पुण्यात घर घेतल्यानं नेमकं कुठे घेतलं याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

महेंद्रसिंग धोनी अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळण्यासाठी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर यायचा. तर आयपीएलमध्येही 2 वर्ष तो राइजिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. तेव्हा या क्रिकेट टीमचं होम ग्राऊंडही गहुंजे स्टेडियमच होतं. स्टेडियमच्या आसपासच्या परिसरातील निसर्गाची भूरळ ‘माही’ला पडली होती आणि त्यानं याच परिसरात घर घेण्याचं ठरवलं होतं.

पिंपरी चिंचवडमधील एस्टाडो प्रेसिडेन्शिअल असं धोनीनं घर घेतलेल्या सोसायटीचं नाव आहे. पुण्यात काही कामानिमित्त येणं जाणं झालं तर, धोनी इकडेच येऊन राहतो, अशी माहिती मिळाली आहे. सोसायटीतल्या काही जणांनी त्याला पहाटे 5 वाजता मॉर्निंग वॉकला जातानाही पाहिलं आहे.

दरम्यान, धोनीला निसर्गाच्या सानिध्यात राहायला प्रचंड आवडतं. त्यामुळेच त्यानं रांचीत 7 एकरचा फार्म हाऊस घेतला आहे. त्यानं त्याठिकाणी सेंद्रीय पद्धतीनं शेती केली आहे. त्याच्या शेतातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं विक्रिसाठी रांचीच्या बाजारात पाठवले जातात. या भाज्यांना आणि फळांना रांचीच्या बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे धोनीच्या फार्म हाऊसमधून कुठलीही प्रक्रियी न केलेलं आणि अगदी ताजं दुध विक्रिसाठी जातं. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यानं 8 लाखाचा ट्रॅक्टरही खरेदी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

“मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं”

BCCI ची महत्वाची बैठक; IPL 2021 आणि T20 वर्ल्ड कपबाबत होणार मोठा निर्णय 

4 वर्षांच्या चिमुरडीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल तिच्या धैर्याला सलाम, पाहा व्हिडीओ

विवाहित प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबध ठेवण्यास केली जबरदस्ती; नकार देताच उचललं धक्कादायक पाऊल

“15 लाखांसाठी भारतीय गेल्या सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More