Mahim Assembly Result 2024 | माहीम या मतदारसंघाकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. माहीम मधून प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम मध्ये यावेळी तिरंगी लढत बघायला मिळत आहे. येथे मनसेकडून अमित ठाकरे तर महाविकास आघाडी कडून महेश सावंत व शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ( Mahim Assembly Result 2024)
या मतदारसंघाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. राजकारणात आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांनीही पाऊल ठेवलं आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. माहीमची जागा ही खरे तर राज ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. येथे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना यश मिळणार का, ते आमदार होणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सावंत आणि सदा सरवणकर यांनी आधीपासूनच स्वतःचा मतदार वर्ग निर्माण केला आहे. मात्र, अमित ठाकरे यांनी देखील घरोघरी प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय.
माहीममधून कोण आघाडीवर?
आता या जागेवर कोण बाजी मारणार ते आज 23 नोव्हेंबररोजीच स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 मतदार संघासाठी नुकतेच मतदान पार पडले असून आज त्याचा निकाल जाहीर होत आहे.माहीममधून सध्या आमित ठाकरे हे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडीवर दिसून येत आहेत. ( Mahim Assembly Result 2024)
दरम्यान, माहीममधून आता महाविकास आघाडीचे महेश सावंत हे तब्बल 9 हजार मतांनी आघाडीवर दिसून येत आहेत. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनंतर माहीममधून मविआचे उमेदवार महेश सावंत हे विजयी झाले आहेत. येथे अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे.
News Title : Mahim Assembly Result 2024
महत्वाच्या बातम्या –
परळीत धनंजय मुंडे जोमात, तब्बल ‘इतक्या’ हजार मतांनी घेतली आघाडी!
विधानसभा LIVE अपडेट्स! पाहा कोण किती मतांनी आघाडीवर
राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला; ‘या’ नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात
बारामतीत ‘पवार घराण्याची’ प्रतिष्ठा पणाला..! काका-पुतण्याच्या लढाईत कुणी घेतली आघाडी?
‘निकाल आल्यावर 48 तासांच्या आत…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य