Mahim Constituency | माहीम या मतदारसंघाकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. माहीम मधून प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम मध्ये यावेळी तिरंगी लढत बघायला मिळत आहे. येथे मनसेकडून अमित ठाकरे तर महाविकास आघाडी कडून महेश सावंत व शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Mahim Constituency )
या मतदारसंघाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. राजकारणात आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांनीही पाऊल ठेवलं आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. अगोदर तर, अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे पाठिंबा देणार का?, याबाबत चर्चा रंगत होत्या. कारण, जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळीमधून निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले होते, तेव्हा राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. आता अमित ठाकरे निवडणूक लढण्यास उतरले म्हटल्यावर उद्धव ठाकरे देखील त्यांना पाठिंबा देत येथे उमेदवार देणार नाही, अशा चर्चा रंगल्या होत्या.
माहीममध्ये कोण बाजी मारणार?
यावरून मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वार देखील पाहायला मिळाला होता. मात्र, ठाकरे गटाने येथे उमेदवार देत या चर्चेवर पाणी फेरले. येथे शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना संधी दिली आहे. सरवणकर यांनी येथे आपलाच विजय होणार, हा विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी अमित ठाकरे यांच्या विजयाच्या मतदारसंघात काहीच आशा नसल्याचं म्हणत आपलाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला होता. तर प्रचार काळात ठाकरे गटाकडून अमित ठाकरे यांना चांगलंच टार्गेट करण्यात आलं होतं. दुसरीकडे राज ठाकरे यांनीही आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा गाजवल्या. (Mahim Constituency )
माहीमची जागा ही खरे तर राज ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. येथे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना यश मिळणार का, ते आमदार होणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सावंत आणि सदा सरवणकर यांनी आधीपासूनच स्वतःचा मतदार वर्ग निर्माण केला आहे. मात्र, अमित ठाकरे यांनी देखील घरोघरी प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय.
आता या जागेवर कोण बाजी मारणार ते उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबररोजीच स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 मतदार संघासाठी नुकतेच मतदान पार पडले असून उद्या त्याचा निकाल जाहीर होत आहे. उद्याच महाराष्ट्रात कुणाची सत्ता स्थापन होणार, त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Mahim Constituency )
News Title : Mahim Constituency Assembly Result 2024
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्रातील ‘हे’ मतदारसंघ ठरू शकतात जायंट किलर!
निकालापूर्वीच शरद पवार ॲक्शन मोडवर; उमेदवारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना?
विद्यार्थ्यांनो… दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये पुन्हा बदल?
सत्ता स्थापनेबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाले..
भाजपकडून अपक्षांना ‘इतक्या’ कोटींची ऑफर?; राजकारणात खळबळ