महिंद्रा देणार टाटाला टक्कर; नव्या इलेक्ट्रिक SUV चा बाजारात धमाका

नवी दिल्ली | महिंद्रा अॅन्ड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कार नेहमीच नवनवीन कार बाजारात लाॅन्च करत असतं. यावेळी मात्र प्रतिक्षा होती ती महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रिक Suv कारची होय. अखेर बहुप्रतिक्षित अशी महिंद्रा अ‌ॅन्ड महिंद्राची इलेक्ट्रिक काॅम्पक्ट SUV XUV400 भारतात लाॅन्च करण्यात आली आहे.

ही इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक काॅम्पक्ट SUV XUV300 वर आधारित आहे. या कारची किंमत देखील जारी करण्यात आली आहे. या XUV400 चा मुकाबला टाटा नेक्साॅन ईव्ही (Tata Nexon EV) कारसोबत होणार आहे. या महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक SUV दोन वेगवेगळ्या प्रकांरामध्ये उपलब्ध असणार आहेत.

यात SUV EC आणि SUV EL असे प्रकार असणार आहेत. या Mehindra XUV400 EV ची किंमत 15.99 लाख ते 18.99 लाख असणार आहे. Mehindra XUV400 EV लाॅन्च केल्याच्या एका वर्षात Mehindra XUV400 EV ची 20,000 युनिट्स वितरित करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.

Electric compact SUV पाच वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आर्क्टिक ब्लू (arctic blue,), एव्हरेस्ट व्हाइट (Everest White), गॅलेक्सी ग्रे, नेपाली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू, सॅटिन काॅपरचा ड्युअल टोन या रंगात असेल. Mehindra XUV400 EV मधील PSM इलेक्ट्रिट मोटार 147 hp ची कमाल पाॅवर आणि 310 Nm चा पीक टाॅर्क जनरेट करते. याचा स्पीड 150 Kmph आहे. XUV400 EV SUV 8.3 सेकंदात 0 ते 100 Kmph चा वेग वाढवू शकते.

महत्त्वाच्या बातम्या