‘या’ महिलेच्या जिद्दीचं आनंद महिंद्रांनीही केलं कौतूक, पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली | महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मिडियावर नेहमीच अ‌ॅक्टिव असतात. त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या नजरेत आली की ते नेहमी सोशल मिडीयावर शेअर करत असतात. त्यांचं कौतुक करायला देखील ते विसरत नाहीत.

फक्त भारत (India) नाही तर जगभरातील अनेक असे चांगले आणि मनोरंजक व्हिडीओ ते शेअर करत असतात. तसेच त्यातील कोणाला काही मदत हवी असल्यास ती मदत देखील महिंद्रा करायला विसरत नाहीत.

असाच एक फोटो त्यांनी नुकताच त्यांच्या ट्विटर (Twitter) अंकाउटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी एक महिलेच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. शेअर करण्यात आलेला या फोटोत एक महिला ई-रिक्षाच्या ड्रायव्हर सीटवर बसलेली आहे.

यावरुन ती महिला ई-रिक्षा चालवत असल्याचं समजत आहे. यावेेळी त्यांनी या महिलेची भावनिक गोष्टही सांगितली आहे. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी ती कशी सांभाळत आहे हे सांगितलं आहे.

त्या महिलेचं नाव परमजीत कौर आहे. ती पंजाबची आहे. तिचा नवरा गमावल्यानंतर ती तीच्या कुटुंबाची प्रमुख आहे. तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. तिची जी रिक्षा आहे त्यानेच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत आहे. असं त्यांनी त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहलं आहे.

आनंद महिंद्राची ही पोस्ट सध्या व्हायरल (Viral) होत आहे. अनेक लोकांनी हा फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याबद्दल महिंद्रांचे आभार मानले आहेत. काहींनी या महिलेला रोल माॅडेल म्हणून देखील संबोधलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More