Mahindra च्या ‘या’ कारचा बाजारात धुमाकूळ; मोडले सगळे रेकॉर्ड

नवी दिल्ली | महिंद्रा (Mahindra) हा भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील ICE SUV सेगमेंटमधील एक अतिशय लोकप्रिय ब्रँड आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्येही उतरत आहे आणि तेव्हापासून सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढली आहे.

कंपनीच्या बहुप्रतिक्षित आगामी इलेक्ट्रिक SUV MahindraXUV400 चे बुकिंग सुरु झालं आहे आणि त्याला ग्राहकांचं खूप प्रेमही मिळताना दिसतंय.

कंपनीने अवघ्या 4 दिवसात 10,000 बुकिंगचा आकडा पार केला आहे. महिंद्राने (Mahindra) 26 जानेवारी रोजी XUV400 इलेक्ट्रिक SUV साठी बुकिंग उघडलं आणि इलेक्ट्रिक SUV चं बुकिंग 10,000 युनिट्सच्या पुढे गेले आहेत.

दरम्यान, कंपनीने स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. सर्वात वेगवान ईव्ही आता भारतातील सर्वात वेगवान बुक केलेली ईव्ही आहे.

4 दिवसात 10,000 बुकिंग दर्शवतं की टाटा या सेगमेंटमध्ये कठीण स्पर्धेला सामोरे जाणार आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.

Mahindra XUV400 दोन प्रकारात विकली जाईल. महिंद्रा (Mahindra) मार्च 2023 पासून हाय-स्पेक XUV400 EL प्रकाराची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान लोअर-स्पेक XUV400 EC प्रकाराची डिलिव्हरी सणासुदीच्या हंगामात म्हणजेच दिवाळीच्या आसपास सुरू होऊ शकते.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More