देश

मोलकरणीवर 9 जणांचा बलात्कार, रुग्णालयात डाॅक्टराच्या मित्रानेही केला अत्याचार

नवी दिल्ली | घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर 5 महिने 9 जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कळस म्हणजे वेदना असह्य झालेल्या या महिलेला रुग्णालयाच दाखल करण्यात आल्यानंतर डाॅक्टराच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला आहे.

दिल्लीतील शहादरा भागातील ही घटना आहे. महिलेवर घरमालकाने बलात्कार केला आणि त्याचा व्हीडिओ बनवत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

यानंतर घरमालकाने आपल्या मित्रांनाही महिलेवर बलात्कार करायला लावले. वेदना असह्य झाल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली.

मात्र येथेही तिच्या मागची शनी संपली नाही. डाॅक्टराच्या मित्रानेही मदतीच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केला. 

दरम्यान, महिलेने कसेबसे पोलीस स्टेशन गाठल्याने ही बाब उघड झाली.

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीवर खास गाणं

-उदयनराजेंचं तिकीट फायनल; शरद पवारांनी उदयनराजेंकडं व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा!

मनसे पदाधिकाऱ्याला 6 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!

“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या