बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या जावयाच्या अटक प्रकरणातील मुख्य आरोपीचा मोठा खुलासा, म्हणाला तो गांजा…

मुंबई | अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत त्यांचे जावई समीर खान यांच्या अटकेप्रकरणी काही धक्कादायक दावे केले होते. एनसीबीने माझ्या जावयाकडून जप्त केलेली वस्तू ही ड्रग्ज नसून हर्बल तंबाखू असल्याचा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला होता.

यावेळी बोलताना एनसीबी एवढी मोठी यंत्रणा पण त्यांना गांजा आणि हर्बल तंबाखूतील फरक कळत नाही का?, अशी टीकाही केली होती. तर आता समीर खान अटक प्रकरणातील मुख्य आरोपी करण सजनानीनेही त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगत मोठा दावा केला आहे. एनसीबीने चुकीच्या पद्धतीने अटक केली असल्याचं सजनानीचं म्हणणं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सजनानीने सांगितलं की, तो गांजा नसून हर्बल तंबाखू होती. हर्बल तंबाखूला गांजा दाखवत एनसीबीने आम्हाला चूकीच्या पद्धतीने अटक केली. आम्ही 8 महिने विनाकारणच तुरूंगात राहिलो, असा दावा करण सजनानीने यावेळी केला आहे. एनसीबीने जप्त केलेल्या पदार्थाचे रिपोर्ट्सही खूप उशीरा आल्याचं त्यांनी सांगितलं.

तर या रिपोर्ट्सनूसार तो 200 किलो गांजा नसल्याचं स्पष्ट झालं. मागच्या महिन्यात मी जामीनावर बाहेर आलो. समीर खान यांचीही तुरूंगातून सुटका झाली पण आमच्या बाबतीत चूकीचं घडलं असल्याचा आरोपही करण सजनानीने केला आहे. तर सुशांत सिंह प्रकरणातही कोणता संबंध नसताना मला आरोपी बनवलं असल्याचंही सजनानीने सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या-

‘सर, बेइज्जती केली जातेय…’, अन् समीर वानखेडे वैतागून भडकले

पाकला बरबाद करणं आमचं पहिलं लक्ष्य; ‘या’ कारणांमुळे इसिस खुरासान गटाने दिला इशारा

“चेंबुरमधील ‘तो’ व्यक्ती आमचा मित्र नाही तर कार्यकर्ता”

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

‘मरेल पण भाजप सोबत जाणार नाही’; प्रियंका गांधींचं भाजपवर शरसंधान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More