Majhi Ladki Bahin Yojana l अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक केंद्र व तहसील कार्यालयात महिलांची मोठी गर्दी दिसून आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित माहिती :
वय : 21 ते 60 वर्षे असणे आवश्यक.
नफा : लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रति महिना मिळणार.
सरकारकडून वार्षिक निधी : 46000 कोटी रुपये मिळणार.
अंमलबजावणी : जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
कोण पात्र असेल? :
– महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
– विवाहित, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आणि निराधार महिला.
– वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
Majhi Ladki Bahin Yojana l या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार नाही? :
– वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असलेले
– घरी कोणताही सदस्य कर भरत असल्यास लाभ मिळणार नाही.
– कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी किंवा पेन्शन मिळत असल्यास लाभ मिळणार नाही.
– कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास लाभ मिळणार नाही.
– कुटुंबाकडे 4 चाकी (ट्रॅक्टर सोडून) आहेत.
कोणती कागदपत्रे लागणार? :
– आधार कार्ड
– शिधापत्रिका
– उत्पन्नाचा दाखला
– रहिवासी दाखला
– बँक पासबुक
– पासपोर्ट फोटो
News Title : Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024
महत्त्वाच्या बातम्या-
पाणीपुरीवर येणार बंदी; ‘या’ सर्वात मोठ्या आजाराचा धोका
सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होण्याची शक्यता
अखेर करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनबदल केला मोठा खुलासा….