बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एटीएस आणि क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; जोगेश्वरीतून एक संशयित दहशतवादी ताब्यात

मुंबई | महराष्ट्रा एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ही कारवाई रात्री उशिरा महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यातच आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संशयित व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित असून, तो जान मोहम्मद याचा हँडलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. जाकीर हा जान मोहमद याच्या संपर्कात होता. जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितलं, असा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी 14 सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं असून तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याच्या पत्नीने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली.

थोडक्यात बातम्या- 

“मोदींचा चेहरा नसेल तर नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील”

“विकासाच्या नावावर उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”

बुस्टर डोसबाबत आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी दिला तर…”

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More