पुणे महाराष्ट्र

IPS कृष्णप्रकाश अ‌ॅक्शन मोडमध्ये, अवैध धंदे करणारांची आता खैर नाही!

Photo Credit- Krishna Prakash Facebook Page

पुणे | सिंघम स्टाईलने कारवाया करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस ओळखले जातात. अशाच एका गुन्ह्यात आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या पथकाने विक्रीसाठी ठेवलेल्या अवैध गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध गुटख्यावर धाडी टाकायला सुरवात केली. अवैध धंद्यावर जबर बसावी यासाठी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली होती. या पथकाने चाकणमध्ये धाड टाकून 1 लाख 55 हजारांचा माल जप्त केला. आरोपी दिनेश याने मोठ्या प्रमाणात कडाचीवाडी येथे वैध गुटखा साठवला होता.

पिंपरी चिंचवडच्या ग्रामीण भागात अवैध धंद्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर पथकाने धडक कारवाई करत 100 दिवसात 5 कोटींचा मोठा माल जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने अवैध गुटखा व्यतिरीक्त अवैध दारु विक्री, जुगार, मटका, भेसळयुक्त आँईल, अनैतिक देहव्यापार, गांजा बाळगणे अशा कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत 119 केसेस दाखल केल्या असून 500 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ट पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी ही कामगिरी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणार!

कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा???

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ही धक्कादायक माहिती आली समोर

कशी नशिबानं थट्टा आज मांडली!; ‘शून्य…’ विराट कोहलीचा विश्वासच बसला नाही!

जगातील सर्वात जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या