बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

मुंबई | एप्रिलमध्ये सुरू झालेले आयपीएलचे सामने कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते. आयपीएल दरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं आयपीएल थांबवण्यात आली. मात्र, आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्यानं उर्वरित आयपीएल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आता उर्वरित आयपीएलच्या सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यातच आता राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघात मोठे बदल केले आहेत.

आयसीबीने संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. तर काही खेळाडूंचा पत्ता कट केला आहे. आरसीबीसाठी खेळणारे पाच परदेशी खेळाडू उर्वरीत आयपीएल सामन्यांसाठी मुकणार आहेत. यामध्ये न्यूझीलंडचे फीन अॅलन आणि स्काॅट कुगलायन तर ऑस्ट्रेलियाचे केन रिचर्डसन, डाॅनियल सॅम्स आणि अॅडम झॅम्पा हे पाच खेळाडू आहेत. त्यांच्या जागी आता आरसीबीने तीन नव्या चेहऱ्यांना संघात संधी दिली आहे.

फिरकीपटू अॅडम झॅप्माच्या स्थानी आरसीबीच्या हाती मोठा खेळाडू लागला आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगा याचा आरसीबीने संघात समावेश केला आहे. तर वेगवान गोलंदाज दुष्मंथ चमीरा आणि टीम डेव्हिडचा देखील समावेश करण्यात आला आहे. वानिंदु हसरंगा याला संघात करारबद्ध केल्यानं आरसीबीच्या संघाची ताकद वाढलेली दिसेल.

दरम्यान, आरसीबीच्या मुख्यप्रशिक्षकाने संघाचा राजीनामा दिल्यानं आता आरसीबीच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. गुणतालिकेत आरसीबीला सध्या तिसऱ्या स्थानी आहे. एकूण 7 सामन्यात आरसीबीने 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे यावेळेस आरसीबीकडे आयपीएल जिंकण्याची संधी आहे.

थोडक्यात बातम्या-

“आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही”

राष्ट्रवादीचं महागाई विरोधात ‘जागरण गोंधळ’ आंदोलन; मुरळीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

अफगाणिस्तानात भारतीय नागरिक अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; आली ‘ही’ माहिती समोर

कौतुकास्पद! तरुणीने अपंगत्वावर मात करुन केला डान्स, पाहा व्हिडीओ

काय सांगता! कपाशीच्या पिकाला चक्क काकडी?, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More