बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात शेतजमीन खरेदी- विक्री करत असाल तर वाचा हे नियम , नियमात झाले मोठे बदल!

मुंबई | महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचं परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी प्रसिद्ध केलं आहे. गेल्या काही वर्षात शेतजमिनीच्या किंमतीत खूप वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे लहान भाग करुन त्यांची विक्री करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही. जर एक, दोन किंवा तीन गुंठे असे शेतजमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होताना शासनाच्या निदर्शनास आलं आहे. आता शासनाच्या नविन आदेशानुसार एखाद्या गट नंबरमध्ये तुम्हाला आता यापुढे एक, दोन किंवा तीन गुंठे शेतजमीन खरेदी किंवा विक्री करणार असाल तर ती शेतजमीन तुमच्या नावावर होणार नाही.

परंतू गट नंबरमध्ये तुम्हाला आता यापुढे ले- आऊट करून त्यात एक, दोन किंवा तीन गुंठे शेतजमिनीचे तुकडे करुन त्यास जिल्हाधिकारी यांची संमती घेतल्यावर शेतजमीन तुमच्या नावावर होऊ शकते. यापुर्वी एखाद्या व्यक्तीनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी अशा प्रकारचा व्यवहार केला असेल तर त्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

आपल्या राज्यात शेतजमिनीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. बागायती, कोरडवाहू, वरकस जमीन असे तीन प्रकार आहेत. राज्यातील प्रत्येक महसूल विभागात वेगवेगळे क्षेत्रफळ ठरवलेलं आहे. त्यामुळे जर शेतजमीन खरेदी-विक्री करणार असाल तर हे नवे नियम घेऊनच व्यवहार करावा.

थोडक्यात बातम्या –

तुमच्यामुळे जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतून पळणारा नाही- उद्धव ठाकरे

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

आमदार अशोक पवारांच्या ‘एक हात मदतीचा’, आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; 28 ट्रक कोकणाकडे रवाना!

“शरद पवारांना करायचं काहीच नसतं फक्त भावल्या नाचवायच्या असतात, राहुल गांधींना लवकरच कळेल”

पुण्याच्या ‘या’ गावात महिलांना पुढचे 3 महिने गरोदर न राहण्याच्या सूचना!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More