बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महामार्गांच्या कामात मोठा भ्रष्टाचार, चौकशी झालीच पाहिजे”

नागपूर | महामार्गांच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महामार्गाच्या कामाता शिवसेनेच्या स्थानिक लोकल प्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीवरून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर टीका केली आहे.

महामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्र त्यांच्या मंत्रालयाला दिली आहेत. त्याची एक श्वेतपत्रिका आणि चौकशी करण्यात यावी, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. महामार्गाची काम झाली पाहिजेत. जर यामध्ये कोणी आढथळा आणत असेल तर त्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरूनही नानांनी टीका केली आहे. ज्यावेळी भाजप-शिवसेना युती होती त्यावेळी गडकरींना कधी शिवसेनेवर टीका करावीशी वाटली नाही का?, मात्र आजे ते पत्र लिहून आरोप करत आहेत. त्यांना दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले नाहीत ना?, असा सवाल करत पटोलेंनी मोदींवरही निशाणा साधला आहे.

दरम्यान, नाना पटोलेंच्या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गडकरींनी पाठवलेल्या पत्राची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“नितीन गडकरींना शिवसेनेवर आरोप करायला दाढीवाल्याने सांगितलेत का?”

‘कर नाही त्याला डर कशाला’; भाजपने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर सुनिल शेळकेंचं प्रत्युत्तर!

‘चिक्कीचा ब्रँड माझ्या नावाने वाढत असेल तर…’; चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

‘या वयातही आशाताई काय दिसतात ना’; राज ठाकरेंनी केली आशा भोसलेंची प्रशंसा

मोठी बातमी! रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर रद्द, उदय सामंतांच्या भेटीनंतर मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More