महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; उद्धव ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापलेला आहे तर दुसरीकडे आमदार अपात्रतेच्या हालचाली सुरू आहेत. अशात एक अत्यंत  महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात खासदारांनी द्रौपदी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

पत्रात केली महत्त्वाची मागणी…

मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदारांचं शिष्टमंडळ खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आपली भेट घेऊ इच्छित आहेत. आम्ही येत्या 5 आणि 6 नोव्हेंबरला सर्वजण आपली भेट घेऊ इच्छित आहोत. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आम्हाला वेळ देण्याची कृपा करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी पत्रात केली आहे.

या पत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊ इच्छित शिष्टमंडळाची नावे देखील सांगण्यात आली आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील प्रभू या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दोन ते तीन महिन्यांमध्या याबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती ठाकरे गटाला वेळ देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली