बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिहारमध्ये दोन तरूण नेत्यांची भेट; दिल्लीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या

पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीनंतर एलजेपीमध्ये मोठ्या राजकीय हालचाली घडल्या होत्या. काका पुतण्या यांच्यात पक्षीय श्रेयवादाची लढाई सुरू होती. त्यानंतर माजी दिवंगत मंत्री रामविलास पासवान यांचे सुपुत्र आणि एलजेपीचे खासदार चिराग पासवान यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता बिहारमध्ये मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

चिराग पासवान यांनी आरजेडीचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या दोन युवा नेत्यांच्या भेटीनंतर बिहारच्या तसेच दिल्लीतील देखील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरजेडी आणि एलजेपी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर भाजपला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे.

रामविलास पासवान यांचं येत्या 12 सप्टेंबरला वर्षश्राद्ध आहे. त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्या भेटीवेळी राजकीय विषयांवर देखील चर्चा झाल्याचं समजत आहे. त्यामुळे दिल्लीत देखील या नेत्यांच्या भेटीनंतर चर्चा रंगली होती.

दरम्यान, 2010 ची विधानसभा निवडणूक आरजेडी आणि एलजेपी यांनी एकत्र लढवली होती, अशी आठवण त्यावेळी तेजस्वी यादव यांनी सांगितली. तर उद्या लालू प्रसाद यादव यांची दिल्लीत भेट घेणार असल्याच देखील चिराग पासवान यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

तालिबानविरोधात भारत ठरणार किंगमेकर???; दोन महासत्तांनी भारताकडे मागितली ‘ही’ मोठी मदत

‘मुजोर माजी मंत्रिपुत्राच्या मुसक्या आवळा’; स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना निवेदन

राऊतांच्या 2 अपेक्षा, भाजपचे 5 प्रश्न; राऊत-भाजप वाकयुद्ध रंगलं!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

धक्कादायक! तालिबान्यांच्या भीतीने देश सोडून गेलेल्या नागरिकांना ‘या’ शेजारी राष्ट्राने हाकललं

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने, संपुर्ण महाराष्ट्रांचं लक्ष!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More