बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशिया-युक्रेन युद्धात मोठी उलथापालथ, रशियन मीडियाच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली | युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाचं रुपांतर आता मोठ्या युद्धात झालं आहे. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवमध्ये प्रवेश केल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.

सैन्यबळाने बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेनची सेना जिवाची बाजी लावून लढताना दिसत आहे. युक्रेन या युद्धात एकाकी पडल्याने आता या युद्धात रशियाचं वचर्स्व निर्विवाद राहणार असल्याचं चित्र दिसतंय. अशातच आता रशियन मीडियाच्या दाव्याने जगभर एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेस्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचे निमंत्रण पाठवल्याचा दावा केला जात आहे. रशियन मीडियाने देखील हा दावा केला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. वाटाघाटीच्या माध्यमातून प्रश्न सुडवण्याचा प्रयत्न केला जातोय.

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना फोन केला आहे. जिनपिंग यांनी पुतिन यांना युक्रेनसोबत वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला होता. त्याबरोबर भारताने देखील शांततेचा पर्याय दोन्ही राष्ट्रांना सुचवला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी ! ईडी कोठडीत नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

“सत्ता गेल्यापासून भाजपच्या बुडाला आग लागलीये”

बापाचं काळीज ते, लेकीला निरोप देताना युक्रेनमधील बाप धायमोकळून रडला, पाहा व्हिडीओ

“तुमचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का?, रोज गंगेत स्नान करुन पाप करतात”

युक्रेनमधील सायकलस्वारावर पडला रशियाचा बॉम्ब, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More