बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Makar sankranti 2022: ओमिक्राॅनविरोधात रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी तिळाचे लाडू सेवन करा

नवी दिल्ली | भारतातील प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व असतं. त्याचप्रमाणं हिंदू धर्मात मकर संक्रांतीचंही विशेष महत्त्व आहे. अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी तिळाचे लाडू (Til Laddu) तयार करण्याची परंपरा आहे. हे लाडू जेवढे चविष्ट असतात त्यापेक्षा जास्त ते आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.

सध्या जगभरात कोरोना आणि ओमिक्राॅनचा शिरकाव सुरु आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितलं जात आहे. अशातच या व्हायरसपासून वाचण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्तिही चांगली हवी. त्यामुळे मकर संक्रांती स्पेशल केला तिळाचे लाडूचे सेवन करा.

रोगप्रतिक्राशक्ति वाढवण्यासाठी तिळाचे लाडू एकदम फायदेशीर आहेत. तिळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अॅंटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहे. तीळ विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे नवीन हाडे तयार करण्यास आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

दरम्यान,  हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, त्यामुळेच मकर संक्रांतीच्या आधीच बाजारात तिळाचे लाडू सहज उपलब्ध होतात. जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू घरी बनवत आहात तर ते तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरतील.

थोडक्यात बातम्या – 

Omicron पासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

कोरोना झालेल्या मुलासोबत महिलेनं केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर

Omicron चं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, दिसल्यास तात्काळ डाॅक्टरकडे जा

‘राजसाहेब, मानलं तुमच्या दूरदृष्टीला’; तृप्ती देसाईंची स्तुतीसुमने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More