मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण?

Makar Sankranti 2025 Why jaggery and sesame are eaten

Makar Sankranti 2025 | आज 14 जानेवारीरोजी वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत हा उत्सव साजरा केला जातोय. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार जेव्हा सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. यंदाही मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरा होत आहे. आजच्या दिवशी तीळ-गुळाचे वाण वाटून शुभेच्छा दिल्या जातात. (Makar Sankranti 2025)

तीळ हा पदार्थ तसा उष्ण आहे. मात्र, मकर संक्रांतीच्या काळात हवेतला गारवा खूप जास्त असल्याने तिळाला महत्व आहे. सर्दीच्या प्रभावापासून स्वतःला वाचवण्यासाठी गूळ आणि तिळाचे लाडू खाल्ले जातात.तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि परिणामी आपल्या शरीराला थंडी सुद्धा वाजत नाही. तसेच या दोन्ही पदार्थांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत राहते. याशिवाय तीळ आणि गूळबाबत एक पौराणिक कथा देखील आहे. ती कथा काय होती, ते पाहुयात.

सूर्य आणि शनी यांची कथा-

पौराणिक कथे नुसार, सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव यांना पसंत करत नसे याच कारणामुळे त्यांनी शनिदेवांना त्यांची आई छाया पासून वेगळे केले होते.आई आणि मुलगा या दोघांना वेगळे केल्यामुळे सूर्यदेव यांना कुष्ठरोगाचा श्राप मिळाला होता. अशा वेळी सूर्यदेव यांचा दुसरा मुलगा यमराज यांनी कठोर तप करून सुर्यदेवांना कुष्ठरोगातून मुक्त केले होते. (Makar Sankranti 2025)

रोगातून मुक्त झाल्यानंतर सूर्यदेवाने रागात येऊन शनी देव आणि त्यांची आई छाया यांच्या घरी कुंभ जाळला. शनि आणि छाया यांच्याबाबत सूर्यदेवाने हे कठोर पाऊल उचलले. यानंतर यमराजांनी सुर्यदेवांना समजावले.त्यानंतर आपला मुलगा शनि आणि छाया यांना भेटण्यासाठी ते त्यांच्या घरी सुद्धा गेले.तिथे गेल्यावर पाहिले तर सर्व जळून खाक झाले होते, सर्व काही नष्ट झाले होते, फक्त काळे तीळ जळत होते.

“…म्हणून काळ्या तिळाला मिळाले महत्व”

सूर्यदेव जेव्हा घरी आले तेव्हा शनिदेव यांनी त्यांचे स्वागत फक्त काळे तीळ द्वारे केले होते त्यानंतर सूर्यदेवाने शनिदेवांना दुसरे मकर (घर) मिळवून दिले. यावेळी सूर्यदेव शनिदेवाला म्हणाले होते की, जेव्हा तुम्ही आपल्या नवीन घरी याल तेव्हा तुमचे गेलेले सर्व वैभव तुम्हाला प्राप्त होईल. सोबतच जी कोणी व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ व गूळ याद्वारे सूर्यदेवाची पूजा करेल त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील. याच कारणामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळ यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. (Makar Sankranti 2025)

News Title : Makar Sankranti 2025 Why jaggery and sesame are eaten

महत्वाच्या बातम्या-

आज मकर संक्रांती, आपल्या प्रियजणांना द्या ‘या’ हटके शुभेच्छा!

आज मकर संक्रांतीला ‘या’ 3 राशींना येणार सोन्याचे दिवस!

शेतकऱ्यांनो ‘ही’ कामाची गोष्ट लवकर करा अन्यथा… पश्चाताप होईल

वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी

जरांगेंना मिठी मारून धनंजय देशमुख ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .