Makar Sankranti 2025 Wishes | आज 14 जानेवारीरोजी वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत हा उत्सव साजरा केला जाईल. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार जेव्हा सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. यंदाही मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरा होत आहे. आजच्या दिवशी तीळ-गुळाचे वाण वाटून शुभेच्छा दिल्या जातात. गोड-गोड बोलले जाते. तसेच, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण नवीन वस्त्र परिधान करून उंच आकाशात पंतग उडवतात. आज मकर संक्रांतीला आपल्या प्रियजनांना, आप्तेष्ठांना तसेच मित्रपरिवाराला गोड गोड शुभेच्छा द्या. (Makar Sankranti 2025 Wishes )
Makar Sankranti 2025 Wishes
झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळात मिसळला गुळ
त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….!
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा!
Makar Sankranti 2025 Wishes
तिळ-गुळ घ्या
आणि गोडगोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा,
तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आठवण सुर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे
शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभू दे,
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!
News Title : Makar Sankranti 2025 Wishes
महत्वाच्या बातम्या-
आज मकर संक्रांतीला ‘या’ 3 राशींना येणार सोन्याचे दिवस!
शेतकऱ्यांनो ‘ही’ कामाची गोष्ट लवकर करा अन्यथा… पश्चाताप होईल
वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी
जरांगेंना मिठी मारून धनंजय देशमुख ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
संतोष देशमुखांना ‘या’ व्यक्तींनी दिली होती जीवे मारण्याची धमकी!