मुंबई | हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पीडित तरुणीला न्याय मिळाला पाहिजे, त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्या. तसे झाले नाही तर समाजावर हैदराबाद येथील एन्काउंटरचं समर्थन करण्याची वेळ येईल, अशी उद्वीग्न प्रतिक्रिया मकरंद अनासपूरे यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हिंगणघाटमधील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दु:ख झालं. तसेच सात्विक संतापही येतोय. काहीही चुक नसताना एखाद्याला प्राण गमवावा लागणे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारकडे हात जोडून विनंती आहे, की अशा प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.
समाजात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही चिंताजनक बाब आहे, असंही ते म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी
पीडितेच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी दिली जाईल- अनिल देशमुख
महत्वाच्या बातम्या-
लवकरात लवकर आरोपीला फासावर लटकवू- उद्धव ठाकरे
अॅट्रॉसिटी प्रकरणात विनाचौकशी गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
“आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली”
Comments are closed.